IND vs ZIM : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 एक असा राऊंड बनवला आहे, जिथे प्रत्येक टीमला विजय हा हवाच. कारण एक पराभवही उपांत्य फेरीची सर्व समीकरणं बिघडवू शकतो. भारताच्या बाबतीत आता असच झालय. सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेने 76 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या उर्वरित दोन संघांविरुद्ध फक्त जिंकूनच चालणार नाही, तर जास्त रनरेट ठेऊन जिंकावं लागेल.