Ravi Shastri : भारताच्या पराभवामुळे मी खुश आहे… रवी शास्त्री यांच्या विधानाने क्रिकेट जगात खळबळ, चाहतेही हैराण

T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 मध्ये ग्रुप 1 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पराभवाचा झटका बसला. यानंतर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे. टीम इंडियाच्या पराभवामुळे मी खुश आहे, असं रवी शास्त्री म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ माजली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.