रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये अजित दादांच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी एफआयआर नाकारला, असा आरोप पवार यांनी केला. डीजीसीएच्या अहवालाचा आधार घेत आम्ही एफआयआरसाठी आलो, पण मोठ्या अधिकाऱ्यांनी दबाव आणून कार्यवाही थांबवली. सामान्य व्यक्तीला मिळणारा न्याय मोठ्या नेत्यांना का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.