T20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेट चाहते भडकले आहेत. त्यांनी कर्णधार सलमान अली आगाच्या कुटुंबावरही निशाणा साधत टीका केली. एवढंच नव्हे तर त्याच्या लहान मुलालाही ट्रोलर्सनी सोडलं नाही, त्यानंतर त्याची पत्नी सबा हिने चोख प्रत्युत्तर देत ट्रोलर्सना फटकारलं.