बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढाकार घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.