रोहित पवार आणि पोलीस निरीक्षकांमध्ये चर्चा सुरू; गुन्हा दाखल होणार का?

अजित पवार यांच्या कथित विमान अपघाताच्या चौकशीसाठी रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. यापूर्वी मुंबईत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी रोहित पवारांची मागणी असून, बारामतीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.