tv9 Marathi Special Report | Malegaon | मालेगाव महापालिकेत नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; निषेधार्थ हनुमान चालिसाचे पठण, राजकीय वातावरण तापले

कायम चर्चेत असलेल्या मालेगाव महानगरपालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महापालिकेच्या कार्यालयात नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्ष आक्रमक झाले आहेत.