मुंबईतील प्रसिद्ध कॉलेजचा नवा प्रताप, शिवसेना ठाकरे गटाचा अल्टिमेटम, म्हणाले उद्यापर्यंत मराठीत..
कांदिवलीतील बालभारती महाविद्यालयाच्या गुजराती नामफलकावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. मराठी भाषा दिनापूर्वी कायमस्वरूपी मराठी फलक लावण्याचा इशारा संतोष राणे यांनी दिला असून मनसेच्या आंदोलनाचा इतिहासही चर्चेत आहे.