सुनेत्रा पवारांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे. मुंबईतील वरळी डोम येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे. कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाईल आणि तो सर्वानुमते मंजूर केला जाईल. निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडेल.