रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या कथित विमान अपघाताच्या चौकशीसाठी बारामती पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. व्हीएसआर आणि डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. समर्थकांकडून अजित पवारांना न्याय मिळण्याची जोरदार मागणी होत आहे.