शिंदे गटातील आमदार व्हीएसआर विमाने वापरणार नाही! एकनाथ शिंदेंची निर्णयाला मंजुरी

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी व्हीएसआर कंपनीची विमाने वापरणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. रोहित पवार यांनी व्हीएसआरवर बंदी घालण्याची मागणी केली असताना, शिंदे गटाच्या नेत्यांनी यापुढे व्हीएसआरची विमाने वापरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.