Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: आमदार रोहित पवार आज बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी दाखल झाले. पण अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी दबावामुळे FIR दाखल होत नसल्याचा आरोप केला.