नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, काल सायंकाळी 3 ते 4 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली.