अजित पवार विमान दुर्घटनेप्रकरणी सीआयडीचा तपास गेल्या २८ दिवसांपासून सुरू आहे. यात घातपात, गुन्हेगारी कट किंवा निष्काळजीपणा यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तपास योग्य दिशेने सुरू असून, आवश्यकतेनुसार केंद्रीय संस्था व तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. निष्कर्षांनुसार गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही केली जाईल.