टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 8 मध्ये काल झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवून भारताने सेमीफायनलमध्ये पोहोण्याच्या आशा जिवंत ठेवल्या, परंतु विजय मिळून देखील कर्णधार सूर्यकुमार यादव समाधानी नव्हता. चेपॉक येथे 256 धावा करूनही भारताने प्रतिस्पर्धी संघाला 184 धावा करू दिल्या. यामुळे कॅप्टन नाराज असून पुढच्या सामन्यापूर्वीच त्याने मोठा इशारा दिला आहे.