नोटाबंदी होऊन नऊ वर्षे उलटल्यानंतरही जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा सापडत असल्याचे समोर आले आहे. एका गृहिणीने बचतीसाठी घरात लपवून ठेवलेल्या नोटा तब्बल नऊ वर्षांनी हाती लागल्या. नोटाबंदीच्या काळात इतर नोटा बदलल्या असल्या तरी, हे पैसे बदलणे ती महिला विसरली होती. यामुळे आता हे पैसे वाया गेल्याने तिला पश्चात्ताप झाला आहे.