तपोवननंतर कुसुमाग्रज उद्यानात झाडं तोडली; नाशिककरांची नाराजी

नाशिकमधील कुसुमाग्रज उद्यानात मलजल निस्सारिकरण केंद्रासाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचे शिलालेखही तोडल्याचा आरोप आहे. तपोवनमधील प्रकरण ताजे असतानाच या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कारवाईची मागणी केली जात आहे. हा प्रकार मराठी भाषा दिनापूर्वी घडल्याने अधिक चर्चा होत आहे.