तिन्ही पक्ष एकत्र बसून राज्यसभेबाबत ठरवू; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीतील (मविआ) तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एकाही पक्षाला ही जागा स्वतंत्रपणे जिंकता येणार नाही. शिवसेनेतही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनेक इच्छुक असून, अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे राऊत यांनी नमूद केले.