कधी-कधी राजकीय नेतेही विनोदाचा भाग होतात! शिंदेंचा मिश्किल टोला

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेची महती, समृद्ध परंपरा आणि विनोदाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी कुसुमाग्रजांना वंदन करत, मराठी माणसाच्या रक्तातच विनोद असल्याचे सांगितले. तसेच, भाषेचे संवर्धन आणि जागतिक स्तरावर तिचा प्रचार करण्याची जबाबदारी अधोरेखित केली.