नाशिकमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव 1 हजार रुपयांच्या खाली आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच्या निषेधार्थ शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लासलगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. कांद्याला 2 हजार रुपये हमीभाव, 1500 रुपये अनुदान आणि समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.