निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!

दिल्ली अबकारी धोरण कथित घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. पुराव्याअभावी आरोप सिद्ध न झाल्याचे कोर्टाने नमूद केले. या निर्णयानंतर अरविंद केजरीवाल भावूक झाले आणि त्यांनी याला सत्याचा विजय म्हटले. आता, सीबीआय या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.