हा डीसीपी कुठल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो? लै भयानक काळ आलाय गड्याहो… किरण माने यांची सूचक पोस्ट चर्चेत

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूची एफआयआर नोंदवण्यासाठी रोहित पवार मुंबई, बारामती आणि सीआयडीकडे प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा एफआयआर नाकारण्यात आला. एका बड्या राजकीय नेत्याच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्याने सामान्य जनतेच्या हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरण माने यांनीही या पोलीस कारवाईवर सूचक पोस्ट करून व्यवस्थेवर प्रकाश टाकला आहे.