इराण-इस्रायल हल्ल्याने मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. अमेरिकेनेही इराणवर हल्ल्याची पुष्टी केली आहे. या वाढत्या संघर्षामुळे जगाला हादरा बसला असून, भारतानेही तेहरानमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीची वॉर्निंग जारी केली आहे. भारतीय दूतावासाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच मदत क्रमांकाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.