केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील 25 गावांना इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली. या निर्णयामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागात खाणकाम तसेच मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर कायमस्वरूपी निर्बंध लागू होणार आहेत.