आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई विमानतळ बंद झाल्याने नाशिकमधील मराठी विश्व संमेलनासाठी आलेल्या मराठी बांधवांच्या परतीच्या प्रवासाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री उदय सामंत यांनी त्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार त्यांची संपूर्ण जबाबदारी घेईल आणि त्यांना परत जाताना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.