नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राहुळगाव येथील एसबीएल कंपनीत डिटोनेटर बनवताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी महिला कामगार असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने मदत व चौकशीचे आदेश दिले आहेत.