बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं

आमदार नितेश राणे यांनी मुंबई-कोकण रो-रो बोट सेवेच्या यशस्वीतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी देवांना मालवणी भाषेत गाराणं घातले. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग या मार्गावरील या सेवेसाठी त्यांनी विविध देव-देवतांना आवाहन केले. हे आपले स्वप्न मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने पूर्ण झाल्याचे नमूद करत, प्रवाशांचे रक्षण आणि कोकण विकासासाठी आशीर्वाद मागितले. वडिलांच्या आरोग्यासाठीही त्यांनी प्रार्थना केली.