महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय प्रशासनाने घेतला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यास मान्यता दिली असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. एसटी महामंडळात राबविण्यात येत असलेले NCMC (National Common Mobility Card) डिजिटल कार्ड मोठ्या प्रमाणावर वितरित केले जात असून प्रवाशांना त्याचा फायदा होत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.