Israel-Iran Conflict : युद्धाचा भडका… पर्यटकांच्या मनात धास्ती, महाराष्ट्रात 99 टक्के बुकिंग रद्द; पर्यटन व्यवसायाचा बोऱ्या वाजला

इस्रायल-इराण युद्धाने गंभीर स्वरूप घेतल्याने जगभरातील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायावर झाला असून, 99 टक्के बुकिंग रद्द झाली आहेत. दुबईसह आखाती देशांत अनेक भारतीय नागरिक अडकले असून, त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यटन उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे.