टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसनचं नाणं अखेर खणखणलं. त्याच्या नाबाद 97 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळाला आणि उपांत्य फेरीत स्थानही पक्कं झालं. त्याच्या खेळीचं कौतुक होत असताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला इतके दिवस संघातून वगळण्याचं कारण सांगितलं.