Beed Holi Donkey Ride: जावई अडकला मेव्हण्यांच्या ‘कचाट्यात’…विडामध्ये गाढवावरून मिरवणूक काढत 90 वर्षांपासून जपली अनोखी परंपरा

Beed Holi Donkey Ride: राज्यात धुळवडीचे अनेक रंग समोर येत आहे. धुळवडीला अनेक प्रथा आणि परंपरा जपल्या जातात. जावायाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची अशीच एक परंपरा या गावात गेल्या 90 वर्षांपासून पाळली जाते. कोणता जावाई कचाट्यात गावातो, यासाठी गावकऱ्यांची एक महिन्यापासून धावपळ उडालेली असते. काय आहे ही अनोखी परंपरा?