आठवडाभरातील जगाला हादरवणारी दुसरी बातमी… आणखी एका देशात तख्तापलट करण्याचा मोठा डाव; पंतप्रधान हतबल

मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी देशात तख्तापालट होण्याचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केला आहे. इराण आणि गाझाला पाठिंबा दिल्याने एका ज्यू समुदाय, आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि विरोधी पक्ष यामध्ये सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, सरकार पाडण्याचे हे षड्यंत्र असून, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.