धुळवडीसाठी निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला मध्यरात्री भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चार वेळा पलटी होऊन विहिरीच्या कठड्याला धडकली. या दुर्घटनेत कृष्णा मुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, तीन मित्र गंभीर जखमी आहेत. बीड शहरावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.