Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, पाच महिन्यात केले 8 कारनामे
भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वनडे क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाने मैलाचा दगड गाठला आहे. दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्फार्टला मागे सोडलं. स्मृतीला सातत्यपूर्ण कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे.