व्हिक्टोरिया थॉमसचा 17 मिनिटांच्या मृत्यूचा थरारक अनुभव सध्या चर्चेत आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत घोषित केलेल्या व्हिक्टोरियाने देहाबाहेरचा प्रवास अनुभवला. नंतर ती चमत्कारिकरित्या जिवंत झाली. डॅनॉन या दुर्मिळ आजारामुळे हृदय निकामी झाल्याने तिने हृदय प्रत्यारोपण केले. आता ती पूर्णपणे निरोगी असून, मृत्यूच्या दारातून परतलेल्या तिच्या कहाणीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.