जगातील 60 देशांचे 5000 टन सोने एका भुयारात, एक वीट 12 किलोची; खजिन्याचे फोटो समोर

लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या भूमिगत तिजोरीत 60 पेक्षा अधिक देशांचे 5000 टनांहून अधिक सोने सुरक्षित ठेवलेले आहे. युरोपमधील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची ही सोन्याची तिजोरी आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. प्रत्येक वीट 12-13 किलो वजनाची असून, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी हे ठिकाण महत्त्वाचे ‘गोल्ड हब’ बनले आहे.