"पाकिस्तानचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या अनेकदा हत्या झाल्या, मृत्यू झाले. ते आपलं शत्रू राष्ट्र आहे. तरीही त्या राष्ट्रात अशा दुर्घटना घडल्यावर या देशाच्या पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केलेल आहे. हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचार पाळत नसू तर आपलं परराष्ट्र धोरण माती खातय"