रत्नागिरीच्या संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कदम यांनी सपकाळ यांच्यावर प्रसिद्धीसाठी बोलण्याचा आरोप करत, काँग्रेसच्या राजवटीत स्मारकासाठी काय केले, असा सवाल विचारला. निधी आणि अधिकारांवरून त्यांनी सपकाळ यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.