Sharad Pawar Health | शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या होत्या. नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला. नियमित तपासणीसाठी शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.