Iran Israel War : इराणशी युद्धादरम्यान अमेरिकेचं पितळ उघड, या देशाने केली मोठी पोलखोल

मध्य पूर्वेतील युद्धात अमेरिकेचे स्पेनबद्दलचे खोटे दावे उघड झाले आहेत. व्हाईट हाऊसने स्पेन अमेरिकन सैन्याला सहकार्य करत असल्याचा दावा केला, पण स्पेनने तो लगेच फेटाळला. यावरून अमेरिकेचे पितळ उघड पडले. स्पेनने इराणवरील हल्ल्यांना विरोध केल्याने डोनाल्ड ट्रम्प संतापले असून त्यांनी व्यापारी संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. स्पेनने स्पष्ट भूमिका घेतल्याने अमेरिकेची कोंडी झाली आहे.