केडीएमसीत भाजप-शिंदेंमध्ये नवा वाद, महापौर तुमचा मग तिजोरी… नेमकं काय घडतंय?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतीपदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. या सत्तासंघर्षामुळे महापालिकेची महासभा रखडली असून नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.