राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद व पक्षाध्यक्षपद सांभाळले आहे. मात्र, अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात डीजीसीए अहवालावर आमदारांनी शंका व्यक्त करत CBI चौकशीची मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे. रोहित पवारही याप्रकरणी सातत्याने चौकशीची मागणी करत आहेत.