ई-चलन प्रणालीविरोधात राज्यव्यापी एल्गार; मुंबई, पुणे, ठाण्यात वाहतूक कोंडी, संपामुळे जनजीवन विस्कळीत
ई-चलन प्रणालीच्या विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटनांनी ५ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यात चक्का जाम आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, स्कूल बस आणि अत्यावश्यक सेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.