Sachin Tendulkar son Arjun Wedding : राज ठाकरेंपासून राहुल द्रविडपर्यंत सचिनच्या लेकाच्या लग्नात दिग्गजांची मांदियाळी; अख्खं क्रिकेट जगत अवतरलं

Arjun Tendulkar- Sania Chandok Wedding : सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या आनंदोत्सवात क्रिकेट जगतातील एमएस धोनी, सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गजांसह, अंबानी कुटुंब, राज ठाकरे आणि बच्चन कुटुंबियांनीही उपस्थिती लावली. मेहंदी, संगीत कार्यक्रमापासून ते मुख्य विवाह सोहळ्यापर्यंत सेलिब्रिटींच्या उपस्थितीने या लग्नाची शान वाढवली.