हाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आभार मानले.