Iran Israel War | BPCLच्या नवीन सूचना; कमर्शियल सिलेंडरच्या ऑर्डरवर बंदी, उद्योग व हॉटेल व्यवसायिकांना फटका

बीपीसीएलने (BPCL) कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर न घेण्याच्या सूचना देत हॉटेल व उद्योग व्यवसायिकांना मोठा धक्का दिला आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण प्लांट्समधून या सूचना डिलर्सला पोहोचल्या आहेत. ही परिस्थिती देशातील गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम करणारी आहे.