इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या झळा आता भारतालाही बसत आहेत. युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडर 60 रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडर 115 रुपयांनी महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे. गॅस तुटवड्याच्या अफवा पसरल्या असल्या तरी घरगुती पुरवठा सुरळीत आहे, पण दोन बुकिंगमधील अंतर 15 वरून 21 दिवसांवर आले आहे. नागपुरात एलपीजीसाठी रांगा लागल्या.