tv9 Marathi Special Report | परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम; धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरी

बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ फड यांनी या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजाभाऊ फड यांनी आरोप करताना म्हटले की, परळीतील छोटे व्यावसायिक महादेव मुडेंची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. एसआयटीकडून अलीकडेच काही संशयितांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव समोर आल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.