Gas Cylinder Rate | गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग

राज्यभरात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून नवे दर आजपासून लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरवाढीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.