इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक अनिश्चितता असली तरी भारतात चिंता करण्यासारखं वातावरण नाही. मोठ्या कच्च्या तेलाचे साठे (250 दशलक्ष बॅरल), ४० देशांमध्ये विस्तारित आयात स्रोत, उच्च शुद्धीकरण क्षमता आणि इथेनॉल मिश्रण धोरणांमुळे देाने ऊर्जा स्थिरता राखली आहे असं पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या (PPAC) अहवालात म्हटलं आहे.